नगर -राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत होत असतांना असताना राज्य सरकारच्या वतीने आपत्ती विरोधात लढण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाय योजना करू न शकणाऱ्या राज्य शासनाचा मेरा अंगण… मेरा रणांगण… महाराष्ट्र बचाव आंदोलनात सहभाग घेत जाहिर निषेध महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केला.
यामध्ये महापौर बाबासाहेब वाकळे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष किशोर वाकळे, सावेडी विभाग शक्ती केंद्र प्रमुख पुष्कर कुलकर्णी, अमोल वाकळे, महेश वाकळे, अजिंक्य वाकळे यांनी राज्य सरकारच्या विरूध्द आंदोलनात सहभाग नोंदविला.