#Tokyo2020 : नीरज चोप्रा आॅलिम्पिकला पात्र

जोहान्सबर्ग : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा याने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत टोकियो आॅलिम्पिकची पात्रता पटकावली. नीरजने अॅककन अॅथलेटिक्स स्पर्धेत ८७.८६ मीटर भालाफेक करत पात्रता मिळवली.

हाताच्या कोपराला झालेल्या दुखापतीतून पुनरागमन करत नीरजने पहिल्याच स्पर्धेत आॅलिम्पिकचे तिकिट मिळवले. आॅलिम्पिकचा निकष नीरजने पार केला. नीरजने स्पर्धेतही अव्वलस्थान पटकावले.

स्पर्धेत भारताच्या रोहित यादवने ७७.६१ मीटर अंतरावर भालाफेक करत दुसरे स्थान पटकावले. टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नीरज हा भारताचा चौथा खेळाडू ठरला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.