नवी दिल्ली – राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा 30 नोव्हेंबर पासून ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. या आयपोमधील शेअरची किंमत 870 ते 900 रुपये असून या माध्यमातून कंपनी 7,249 कोटी रुपये उभे करणार आहे. या आयपीओसाठी गुंतवणूकदारांना दोन डिसेंबर पर्यंत नोंदणी करता येणार आहे.
कर्मचाऱ्यांसाठी 100 कोटी रुपयांचे शेअर राखून ठेवण्यात आले आहेत. या आयपीओमधून आलेल्या पैशाचा वापर कंपनीचा भांडवली पाया भक्कम करण्यासाठी केला जाणार आहे. गुंतवणूदारांना किमान 16 शेअरसाठी नोंदणी करावी लागेल.