भारतात क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याची तयारी; गुंतवणूकदारांचे 70 हजार कोटी लागणार पणाला?

क्रिप्टोकरन्सीच्या अनियंत्रित अस्थिरतेपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी मोदी सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मंगळवारी एक क्रिप्टोकरन्सी विधेयक आणण्याची घोषणा केली, ज्या अंतर्गत देशात सर्व खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यात येईल. ही बातमी समोर येताच सर्व प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये 25 ते 30 टक्के घट झाली आहे. एका रिपोर्टनुसार भारतात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांची संख्या भारताच्या लोकसंख्येच्या 8 टक्के आहे. या गुंतवणूकदारांनी डिजिटल चलनांमध्ये सुमारे 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. क्रिप्टो मार्केटमधील हा भूकंप पाहता, क्रिप्टोकरन्सी बिल काय आहे आणि केंद्र सरकार त्याच्या मदतीने क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण कसे ठेवणार हे समजून घेऊया.

क्रिप्टोकरन्सी बिल म्हणजे काय?

माहितीनुसार, क्रिप्टोकरन्सीच्या नियमनासाठी केंद्र सरकारकडून क्रिप्टोकरन्सी आणि अधिकृत डिजिटल चलन नियमन विधेयक 2021 संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर केले जाईल. या विधेयकाद्वारे, भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या अंतर्गत अधिकृत क्रिप्टोकरन्सी जारी करण्यासाठी एक सुलभ फ्रेमवर्क तयार करण्याची सरकारची योजना आहे. त्याचे तंत्रज्ञान आणि वापराबाबतही तयारी सुरू आहे. तसेच, अशी तरतूद या विधेयकांतर्गत आणली जाईल, ज्यामुळे सर्व खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी येईल.

क्रिप्टोकरन्सी बिलाचा मसुदा

सरकारने हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. सरकार क्रिप्टोकरन्सीवर पूर्णपणे बंदी घालणार असल्याचे संकेत आहेत. सरकार तीन अध्यादेशांसह 26 नवीन विधेयके मांडणार आहे. . मात्र, सरकार क्रिप्टोकरन्सीवर पूर्णपणे बंदी घालणार की काही अटींसह त्याच्या व्यापाराला परवानगी देणार, हे विधेयक मंजूर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

सात दिवसांपूर्वी संसदीय समितीची बैठक

हे लक्षात घेण्यासारखे आहे की सात दिवसांपूर्वी म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच क्रिप्टोकरन्सीसंदर्भात संसदीय समितीची बैठक झाली होती. यात क्रिप्टो एक्‍सचेंज, ब्लॉकचेनचा समावेश आहे. क्रिप्टोकरन्सीच्या नियमन आणि जाहिरातीशी संबंधित पैलूंवर क्रिप्टो ऍसेट कौन्सिल, उद्योग प्रतिनिधी आणि इतर भागधारकांनी चर्चा केली. क्रिप्टोकरन्सी थांबवता येणार नाही, हे या बैठकीत उघड झाले. त्यासाठी नियमन आवश्‍यक आहे.

भारतीयांचे 70 हजार कोटी रुपये पणाला

भारतात क्रिप्टोकरन्सीमध्ये 8 टक्के लोकांनी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकदारांनी जगभरात सध्या प्रचलित असलेल्या अनेक प्रकारच्या डिजिटल चलनांमध्ये सुमारे 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 2009 मध्ये लॉन्च झाल्यानंतर, 2013 पर्यंत, बिटकॉइन हे चलनातील एकमेव डिजिटल चलन होते. पण आता जगभरात सात हजारांहून अधिक वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सी चलनात आहेत. तथापि, बिटकॉइन हे जगातील सर्वात लोकप्रिय डिजिटल चलन राहिले आहे, त्यानंतर इथेरियम आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.