Deem Roll Tech IPO| स्टील आणि अलॉय रोल्स उत्पादक कंपनी डीम रोल टेकचा आयपीओ (Deem Roll Tech IPO) 20 फेब्रुवारी रोजी उघडणार आहे. कंपनीला या इश्यूमधून 29.26 कोटी रुपये उभे करायचे आहेत. या SME IPO मध्ये 22.68 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील आणि 22 फेब्रुवारी रोजी क्लोजिंग होईल. शेअर्सची सूची NSE SME वर 27 फेब्रुवारीला होईल. IPO साठी किंमत 129 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. गुंतवणूकदार 1000 समभागांच्या लाॅटमध्ये बोली लावू शकतात.
FedEx Securities Pvt Ltd ही Deem Roll Tech IPO साठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत. IPO साठी मार्केट मेकर SS कॉर्पोरेट सिक्युरिटीज आहे.
Deem Roll Tech IPO: राखीव शेअरचा तपशील –
50 टक्के इश्यू किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आहे आणि उर्वरित 50 टक्के इतर गुंतवणूकदारांसाठी आहे. कंपनीचे प्रवर्तक ज्योती प्रसाद भट्टाचार्य आणि देव ज्योतिप्रसाद भट्टाचार्य आहेत. सध्या कंपनीत प्रवर्तकांची हिस्सेदारी 92.18 टक्के आहे. मे 2003 मध्ये डीम रोल टेकचा समावेश करण्यात आला.
डीम रोल टेक आर्थिकदृष्ट्या किती मजबूत ?
एप्रिल-सप्टेंबर 2023 मध्ये डीम रोल टेकच्या ऑपरेशन्सचा महसूल 63.79 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2023 मध्ये 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल नोंदवला गेला. डीम रोल टेक आपली उत्पादने 10 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते. या देशांमध्ये अमेरिका, जर्मनी, युरोप, मध्य पूर्व, ओमान, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, बांगलादेश यांचा समावेश आहे. कंपनीचे 3 उत्पादन युनिट आहेत.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून, पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ञाचा सल्ला घ्या. दैनिक प्रभात कधीही कोणालाही येथे पैसे गुंतवण्याचा सल्ला देत नाही.)