दिल्ली – मथुरेतील बांके बिहारी मंदिरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशातील या मंदिरात हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.मात्र आज सकाळी आरतीच्या दरम्यान या मंदिरात भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचे समोर आले. या चेंगराचेंगरीमध्ये अनेक भक्त जखमी झाले आहेत.
दर्शनासाठी मंदिरात तुफान गर्दी झाल्याने हि घटना घडली. गर्दीमुळे पन्नासहुन अधिक भक्त बेशुद्ध झाल्याचे देखील समोर आले. तर या चेंगराचेंगरीमध्ये २ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने पोलीस बंदोबस्त असूनही ही घटना घडली.
Uttar Pradesh | During Mangla Arti at Banke Bihari in Mathura, one devotee fainted at exit gate of temple due to which movement of devotees was restricted. As their was huge crowd, many inside the premises were suffocated due to humidity. 2 people lost their lives: SSP, Mathura pic.twitter.com/UCy1hzVIeI
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 20, 2022
बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी येथे भाविकांची मोठी गर्दी होते. यावेळीही 20 ऑगस्टला पहाटे 1.45 वाजता मंदिराचे दरवाजे उघडताच भाविकांची वर्दळ सुरू झाली आणि बाहेर पडणाऱ्या गेटमधून प्रवेशही सुरू झाला, त्यामुळे बाहेर पडण्याचा मार्गही बंद झाला. त्याचदरम्यान हा अपघात झाला.