नागपूर – नागपूर शहरात शनिवारी भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या भांडीवाटपाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत एका ५०वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सक्करदरा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रेशिमबाग परिसरात भाजपच्या नागपूर शहर शाखेने सकाळी साडे दहा च्या सुमारास हा कार्यक्रम तेथे आयोजित केला होता, तेथे ही घटना घडली.कार्यक्रमादरम्यान बांधकाम कामगारांना भांडी वाटली जात होती आणि कार्यक्रमस्थळी मोठा जमाव जमला होता.मनू तुळशीराम राजपूत असे यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
इतर चार महिलांना किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.