एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळणार..! राज्यातील 1 हजार 135 एसटी कर्मचारी निलंबित

पुणे – आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचार्‍यांनी दिवाळीच्या काळात राज्यभर आंदोलन पुरकरले, मात्र मागील तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे शासनाने हे आंदोलन दडपण्यासाठी हालचाली सुरू केल्यात.

दरम्यान, यासोबतच गुरूवारीच‌ राज्यातील 1 हजार 135 एसटी कर्मचारी निलंबित केले आहेत. यात सर्वाधिक पुणे विभागातील 148 कर्मचारी निलंबीत करण्यात आले आहेत.

एसटीच्या पुणे विभागातील 13 डेपोंमधील 148
कर्मचाऱ्यांचे  गुरूवारी रात्री उशिरा निलंबन करण्यात आले. यामध्ये स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), पुणे स्टेशन, पिंपरीतील वल्लभनगर, राजगुरूनगर, नारायणगाव, भोर, शिरूर, इंदापूर, बारामती, बारामती एमआयडीसी, सासवड, दौंड या एसटी डेपोतील कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

29 विभागानुसार गुरूवारी निलंबित करण्यात आलेले कर्मचारी

पुणे – 148 औरंगाबाद – 15 जालना – 13 बीड – 67 लातूर – 5 उस्मानाबाद – 22 परभणी – 5 मुंबई – 64 पालघर – 57 रायगड – 36 रत्नागिरी- 27 ठाणे – 73 भंडारा – 18 गडचिरोली – 34 नागपूर- 30 वर्धा – 02 कोल्हापूर -15 सांगली – 44 सातारा – 5 सोलापूर – 5 अहमदनगर – 20 धुळे – 54 जळगाव – 91 नाशिक – 54 अकोला -66 अमरावती – 50 बुलडाणा – 40 यवतमाळ -56 चंद्रपूर – 5
एकूण :- 1 हजार 135 कर्मचार्‍यांचे निलंबन

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.