मंचर -पुणे-नाशिक एसटी गाडीची आंबेगाव तालुक्यातील मंचर- पिंपळगाव फाटा येथे अशोका लेलॅंड कंटेनरला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात 19 प्रवासी जखमी झाले.
स्वप्नील अशोक मोराणकर (वय 34, रा. नाशिक), विलास बाबुराव साकवे (वय 33, रा. नाशिक), तपस्वी आकुळ नेरकर (वय 35, रा. नारायणगाव), महिंद्र मोहिते (वय 44, रा. चाकण), विजय रामचंद्र तांबोळी (वय 42, रा. नारायणगाव), अरविंद भाऊसाहेब यादव (वय 28, रा. घुलेवाडी संगमनेर), हरिंद्र कुमार गुप्ता (वय 26, रा. नाशिक), संतोष धोंडिबा अरोटे (वय 30),
लक्ष्मण सिताराम चौधरी (वय 40, दोघे रा. अकोले, लक्ष्मण सीताराम चौधरी (वय 40, रा. जुन्नर), सरिता रामदास धुमाळ (वय 45, रा. नारायणगाव), पुजा दत्तात्रय अलभर (वय 26), सुरेखा विलास लोहकरे (वय 48, दोघी रा. खडकवासला), अनिता प्रभात केदार (वय 20, रा. राहुर साकोर), अलमास गुलाम गैस शेख (वय 43, रा. संगमनेर),
मनिषा अंकुश ससाणे (वय 30, रा. नाशिक), लक्ष्मर सुरेश गागुरडे (वय 58), अनिता नितीन सोनवणे (वय 35, दोघे रा. केशवनगर पुणे), विलास दामाजी लोहकरे (वय 51, रा. दोंदे हवेली) अशी जखमींची नावे आहेत. अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी एसटीबस चालक बाबूराव आण्णा दहिफळे (रा. पांगरीा ता. शिरुर) याच्याविरोधात कंटेनरचालक कपिलदेव तुलसीराम चव्हाण (रा. ओरीपुर उत्तरप्रदेश) मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पुणे येथुन नाशिककडे जाणारी बस (एमएच 14 बीटी 4082) जात असताना अशोका लेलॅंड कंपनीचा कंटेनर (एचआर 55 एए 1414) हा कंटेनर चाकण येथून बटलर कंपनीचे चारचाकी वाहनाचे साहित्य घेऊन नाशिक मार्गे दिल्लीच्या दिशेने जात होता. त्यावेळी एसटी गाडी कंटेनरच्या पाठीमागूनच सुमारे तीन फूट अंतराने येत होती.
पिंपळगाव फाटा येथे सिद्धी हॉस्पिटल समोर एसटी वाहन चालकाने जोरात ब्रेक दाबून समोरील कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. धडक जोरात बसल्याने एसटीतील प्रवासी एकमेकांवर आदळले. यामध्ये प्रवासी जखमी झाले.