धुळ्यात एसटी-कंटेनरचा भीषण अपघात :13 प्रवाशांचा मृत्यू तर 30 जखमी

धुळे : धुळ्यात एसटी आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 30 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावाजवळील सब स्टेशनजवळ रात्री हा भीषण अपघात झाला. एसटी आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली आहे. या धडकेत एसटीच्या समोरील भाग अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.

दोंडाईचा-निमगुळ रस्त्यावर रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-शहादा बस आणि कंटेनर यांची धडक झाली. अपघातात बसचालक मुकेश पाटील यांच्यासह 13 जण जागीच ठार झाले आहेत. तर 30 जखमी असून पैकी 6 गंभीर आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती वर्तवली जात आहे. अपघाताताची माहिती मिळताच जखमींच्या मदतीसाठी निमगुळ ग्रामस्थांनी धाव घेतली. शहादा आगाराचे बसचालक मुकेश पाटील हे जागीच ठार झाले आहेत. बसमधील जखमी झालेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी ग्रामस्थांनी मदत करावी असे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले होते. दरम्यान, रावल यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देवून जखमींवर सर्वतोपरी उपचार सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.