श्रीनगर – श्रीनगर शहर आणि काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी हिंसक प्रकार घडल्याने तेथे शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत. काही निदर्शकांवर पेलेट गन झाडण्यात आल्याने अनेक जण जखमी
झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले आहे.
शनिवारी रात्री श्रीनगरच्या ज्या भागात हिंसक घटना घडल्या तेथे किमान चोवीस जण जखमी झाल्याचे या बातम्यांमध्ये म्हटले आहे. श्रीनगर शहराच्या रैनवाडी, नौहट्टा, गोजवारा या भागात हे हिंसक प्रकार घडले आहेत.
निर्दशकांना पांगवण्यासाठी अश्रुधुर आणि मिरची पावडर ग्रेनडचा वापर करून स्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. दरम्यान या पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.