कोलंबो – करोना विषाणूंचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला तोंड देण्यासाठी कित्येक देशांनी आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. त्यात आला श्रीलंका हा छोटा देशही पुढे आला आहे. श्रीलंका क्रिकेट मंडळाने तेथील सरकारला 1 कोटी रुपयांची मदत दिली आहे.
करोनामुळे जवळपास दोनशे देशांत हाहाकार माजला आहे. करोनामुळे आतापर्यंत 16 हजार लोक मृत्यूमुखी पडले आहेत. श्रीलंकेत देखील करोनाचे जवळपास 100 रुग्ण आढळले आहेत.
सरकारी पातळीवर निधी कमी पडत आहे, तसेच रुग्णांची देखभाल व त्यांचे विलगीकरण यांसाठी सातत्याने आर्थिक तरतूद करावी लागत आहे. त्यामुळेच आपली नैतिक जबाबदारी ओळखून त्यांच्या क्रिकेट मंडळाने 1 कोटी रुपयांची मदत सरकारला करण्याचे ठरवले आहे.