अडीच हजार घरावर वॉच

नगर – शहरात करोना विषाणूचे तीन रुग्ण आढळून आलेले असून, या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अडीच हजार घरांवर महापालिकेची आठ पथके लक्ष ठेवणार आहेत. नागरिकांमध्ये अजूनही करोना बाबत गांभीर्य नाही. नागरिकांनी या रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन सोशल डिस्टन्स ठेवावा असे, महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी पत्रकार परिषदेत संगितले.यावेळी महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार, उपायुक्त प्रदीप पठारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे उपस्थित होते.

मायकलवार म्हणाले, मी महापालिकेत येऊन एक आठवडा झाला आहे. त्यामुळे अजून नगर शहराची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे मला सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. नगर शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहे. यातील तिसरा रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 23 जणांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून, 23 जणांची रक्त तपासणी अहवाल उद्या प्राप्त होतील.

शहरात आढळलेले तीन रुग्ण व त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्ती असे सुमारे अडीच हजार घरांवर महापालिका लक्ष ठेवून आहे. त्यासाठी महापालिकेने आठ पथके नियुक्त केली आहेत. यातील प्रत्येक पथकात एक डॉक्टर व चार परिचारिका आहेत. झोपडपट्टीसाठी वेगळेपण पथक नेमण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.शहरात आढळून आलेल्या तीन रुग्णांपैकी एक रुग्ण बरा झाला असून, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात येणार आहे. हा रिपोर्ट आज अथवा उद्या येण्याची शक्यता आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.