कोलंबो – श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकरा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट इतिहासात चामिंडा वास आणि लसिथ मलिंगा यांच्यानंतर नुवान कुलसेकरा हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक गडी टिपणारा वेगवान गोलंदाज होता.
37 वर्षीय नुवान कुलसेकरा याने 184 एकदिवसीय सामन्यांमध्ये 199 बळी टिपले. तर, 58 टी 20 सामन्यांमध्ये 66 बळी मिळवले आहेत. त्याने 15 वर्षाची कारकीर्द घडवली. त्यात 21 कसोटी सामन्यात त्याने 48 गडी बाद केले.