सिद्धू बॅक इन ऍक्‍शन; समर्थकांच्या भेटीगाठी सुरू

कॉंग्रेसचा हात सोडणार नसल्याची ग्वाही

अमृतसर: पंजाबच्या मंत्रिपदाचा राजीनामा देणारे आणि काही दिवस प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेले माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी समर्थकांच्या भेटीगाठी सुरू करताना त्यांना कॉंग्रेसचा हात सोडणार नसल्याची ग्वाही दिली.

मागील काही काळापासून सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यात दुरावा निर्माण झाला. तशातच अमरिंदर यांनी मागील महिन्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल केले. त्यानुसार सिद्धू यांच्यासह काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्यात आला. त्यामुळे आणखीच नाराज झालेल्या सिद्धू यांनी नव्या खात्याचा कार्यभार स्वीकारला नाही. त्यानंतर भूमिका जाहीर करण्याचे टाळत त्यांनी प्रसारमाध्यमांनाही दूर ठेवले.

काही दिवसांपूर्वी त्यांनी दिलेला मंत्रिपदाचा राजीनामा अमरिंदर यांनी रविवारी स्वीकारला. त्यानंतर सिद्धू यांचे पुढचे पाऊल काय असेल आणि ते कॉंग्रेसमध्ये राहणार का, असे प्रश्‍न उपस्थित झाले. आता एकप्रकारे काही दिवस स्वीकारलेला विजनवास सोडून सिद्धू पुन्हा राजकीय कार्यात सक्रिय झाले आहेत. कॉंग्रेसमधून बाहेर पडणार नसल्याची ग्वाही देतानाच ते पक्षासाठी कठोर मेहनत घेण्याचे आवाहनही समर्थकांना करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)