कोलंबो – श्रीलंका क्रिकेट मंडळाने श्रीलंका प्रिमियर लीग 21 नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर टाकली आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना श्रीलंका सरकारच्या विलगीकरण कालावधीच्या नियमांचे पालन करता यावे यासाठी वेळ मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मूळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा येत्या 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार होती, परंतु आता नव्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा येत्या 21 नोव्हेंबरपासून सुरू होईल. आयपीएल स्पर्धा 10 नोव्हेंबरला संपणार आहे.
या लीगमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज व अफगाणिस्तानचे खेळाडू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा दुसऱ्यांदा लांबणीवर टाकावी लागली आहे.