Asia Cup 2023 AFG vs SL : आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यातूनच ब गटातून सुपर फोरमध्ये पोहोचणारे दोन संघ निश्चित होतील.
श्रीलंकेसाठी सुपर फोरचा मार्ग सोपा आहे, तर सुपर फोरमध्ये पोहोचण्यासाठी अफगाणिस्तानला हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल.
श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकात आठ गड्यांच्या मोबदल्यात 291 धावा केल्या असून अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 292 धावांचे लक्ष्य आहे.
श्रीलंकेकडून फलंदाजीत कुसल मेंडिसने सर्वाधिक 92 धावा केल्या. तर निशांकने 41, करुणारत्ने 32, असलंकाने 36, तिक्षनाने 28 आणि वेललागेने 33 धावांचे योगदान दिले.
अफगाणिस्तानकडून गोलंदाजीत गुलबदिन नायबने सर्वाधिक चार विकेट घेतल्या तर राशिद खानने दोन आणि मुजीब उर रहमानने एक विकेट घेतली.