COVID-19 – जगभरातील हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला करोना ( Corona ) अजुनही चिंतेचा विषय बनला आहे. भारतात आता थंडीची जेमतेम सुरूवातच झाली असताना करोनाची लागण झालेल्या काही केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतर्क होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात केरळमध्ये करोनाचे 900 प्रकरणं नोंदवली गेली. देशातील एकूण करोना रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण हे एकट्या केरळ राज्यातील आहेत. दिलासादायक म्हणजे या रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणं आढळली असल्याचं सांगण्यात आलं होत. परंतू आता केरळ मधूनच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
केरळमध्ये करोनाचा सबव्हेरियंट (Covid subvariant) आढळला आहे. ‘JN-1’ असे या सबव्हेरियंटचे नाव आहे. आरटी-पीसीआर टेस्ट केली असता 8 डिसेंबर रोजी हा रुग्ण आढळला. एका महिलेला JN-1 चे संक्रमण झाले आहे. या महिलेला इन्फ्लूएंझा सारख्या आजाराची (ILI) सौम्य लक्षणे होती. शिवाय ती कोविड-19 मधून बरी झाली आहे.
INSACOG प्रमुख एनके अरोरा यांनी सांगितले की, ‘या प्रकाराची नोंद नोव्हेंबरमध्ये झाली होती. हे BA.2.86 चा सबवेरियंट आहे. आमच्याकडे JN.1 ची काही रुग्ण आढळली आहेत. आतापर्यंत या व्हेरियंटचा कोणताही रुग्ण गंभीर असल्याची नोंद झालेली नाही.”
सध्या देशात कोविड-19 चे 90 टक्क्यांहून अधिक प्रकरणे गंभीर नाहीत. संक्रमित लोक त्यांच्या घरात एकांतात राहत आहेत. यापूर्वी सिंगापूरमध्ये एका भारतीय प्रवाशाला JN.1 चा संसर्ग आढळून आला होता.
हा माणूस मूळचा तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी असून 25 ऑक्टोबरला तो सिंगापूरला गेला होता. डिसेंबर महिन्यात थंडी (Winter) सुरु होताच करोनाचा आलेक वाढत चालला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.