ओतूर -डिंगोरे (ता. जुन्नर) येथे मुंबईहून आलेला करोनाचा रुग्ण आढळला असल्याने आणि हा रुग्ण गावात इतरत्र फिरल्याचे लक्षात आल्याने या भागात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जंतुनाशकाची फवारणी करण्यात येत आहे. सध्या राज्यात लॉकडाऊन आहे.
या पार्श्वभूमीवर आणि जंतुनाशक फवारणीवेळी नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यांनी नागरिकांना केले आहे. याबरोबरच डिंगोरे गावातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन जनजागृतीही केली जात आहे.