शिक्रापूर -जगभरात सर्वांनी करोनाचा चांगलाच धसका घेतलेला असताना जिल्ह्यातील अनेक ठिकाणी करोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळे पर्याय अवलंबले जात असताना शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने देखील गावात अनेक ठिकाणी औषध फवारणी केली जात आहे.
ग्रामपंचायतच्या वतीने सर्वत्र स्वच्छतेचा निर्णय घेत गावामध्ये औषध फवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने गावातील वेगवेगळ्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी देखील स्वच्छता पाळण्याचे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले.