Malaysia Masters 2024 : भारतीय जोडी ‘त्रिशा-गायत्री’ची विजयी सलामी….

Malaysia Masters 2024 (Badminton) : सातव्या मानांकित भारतीय जोडी त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी मलेशियन मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेत्या भारतीय जोडीने तैवानच्या हुआंग यू सन आणि लियांग टिंग यू यांचा 21-14, 21-10 असा सरळ गेममध्ये पराभव केला. ‘त्रिशा-गायत्री’चा पुढील फेरीचा सामना गुरूवारी (दि.23मे) तैवानच्याच ‘एस.वाय. सुग’ आणि ‘सी. यू’ या जोडीशी होणार आहे.
पात्रता फेरीत भारताच्या चार शटलर्सना पराभवाचा सामना करावा लागला. कोणालाही मुख्य फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. ओडिशा ओपन सुपर 100 चे विजेतेपद पटकावणाऱ्या सतीश कुमारने मलेशियाच्या चिआम जून वेईचा 21-15, 21-19 असा पराभव केला, परंतु इंडोनेशियाच्या शेसर हिरेन रुस्ताविटोकडून त्याला 21-13, 20-22, 13-21 ने पराभव पत्करावा लागला.
Malaysia Masters 2024 : पी.व्ही. सिंधूची दुसऱ्या फेरीत धडक….
जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपच्या कांस्यपदक विजेत्या आयुष शेट्टीने गुलशन कुमारचा पराभव केला, पण पुढच्या फेरीत तो थायलंडच्या पॅनिचाफोनकडून 21-23, 21-16, 17-21 असा पराभूत झाला. शंकर सुब्रमण्यम आणि तान्या हेमंत यांचाही पराभव झाला. दुहेरीत पलक अरोरा-उन्नती हुड्डा यांनाही सुरुवातीच्या फेरीत पराभव पत्करावा लागला.



