RR vs RCB IPL 2024 Eliminator, Toss Update : आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना आज (22 मे, बुधवार) राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीच्या जवळ जाईल, तर पराभूत संघ स्पर्धेबाहेर जाईल. विजेत्या संघाला क्वालिफायर-2 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागेल. 26 मे रोजी अंतिम सामना होणार आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्स संघाच्या बाजूनं लागला आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यानं टाॅस जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूध्द गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. (Rajasthan Royals elect to bowl against Royal Challengers Bengaluru) त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.
🚨 Toss Update 🚨
Rajasthan Royals elect to bowl against Royal Challengers Bengaluru.
Follow the Match ▶️ https://t.co/b5YGTn6RZd#TATAIPL | #RRvRCB | #Eliminator | #TheFinalCall pic.twitter.com/7zReTDiYP8
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2024
शेवटच्या वेळी 2015 मध्ये हे दोन संघ एलिमिनेटर सामन्यात आमनेसामने आले होते. त्यावेळी ही लढत एकतर्फी झाली होती. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 180 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ 109 धावा करून सर्वबाद झाला. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्सवर यावेळीही दडपण असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग 6 सामने जिंकून प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सला गेल्या 5 सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. अशा स्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एलिमिनेटर सामन्यात विजयी आगेकूच कायम राखायची आहे.
IPL 2024 (RCB vs RR Eliminator) : ..तर सामना ‘न’ खेळताच RCB चे आयपीएलमधील आव्हान येणार संपुष्टात….
तर आरसीबीला बसणार मोठा फटका…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटर सामनाही पावसामुळे रद्द झाला तर गुणतालिकेत दोन्हीपैकी जो संघ वरच्या स्थानावर राहिला होता, तो संघ दुसरा क्वालिफायर खेळण्यासाठी पात्र ठरेल. त्याचबरोबर दुसरा संघ बाहेर पडेल. या नियमामुळे आरसीबीला मोठा फटका बसणार आहे. जर सामना रद्द झाला, तर आरसीबी संघ बाहेर पडेल आणि राजस्थान रॉयल्स पुढच्या फेरीत म्हणजे दुसरा क्वालिफायर सामना खेळेल.