पुणे –सोलारीस क्लब आयोजित सोलारीस करंडक वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या 35 वर्षाखालील गटात पुण्याच्या केतन धुमाळ, निरज आनंद यांच्यासह नरेंद्र सिंग, विजय आनंद यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेच्या 35 वर्षावरील गटात पुण्याच्या केतन धुमाळ याने आपला शहर सहकारी मंदार वाकणकर याचा 6-1, 6-2 असा सहज पराभव केला. काल अग्रमानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का देणाऱ्या नीरज आनंद याने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत आज विवेक खाडगे याचा 6-2, 6-1 असा पराभव केला. नरेंद्र सिंग याने नानू मंगेला याचा 6-0, 6-2 असा तर, विजय आनंद याने संदीप पवार याचा 7-5, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
45 वर्षावरील गटात अव्वल मानांकित नितीन कीर्तने याने रमेश डिसुझा याचा 6-0, 6-0 असा तर, केतन बेडेकर याने दिलीप कुमार याचा 6-1, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. सुनिल लुल्ला याने सुब्रमण्यम याचा 6-2, 6-1 असा तर, नीलकंठ डाबरे याने सतिश बाबू याचा 6-4, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
55 वर्षावरील गटात पुण्याच्या अजय कामत याने रफिक कोटा याचा 6-2, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. एस. शंकर याने अजित भारव्दाज् याचा 6-3, 6-4 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. निर्मल कुमार याने सुनिल बर्वे याचा 6-2, 6-2 असा तर, मेहर प्रकाश याने रविंद्र नगरकर याचा 6-4, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.