लग्न समारंभात दागिने चोरणारी परराज्यातील टोळी जेरबंद; 23 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त

नगर (प्रतिनिधी) – मध्यप्रदेश येथून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन लग्न समारंभातून रोख रक्कम आणि दागिने चोरणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. मध्यप्रदेश येथून सात आरोपी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडून एकूण 23 लाख 33 हजार रुपये किमतीचे वाहने व रोख रक्कम जप्त करण्यात आली.

शिर्डी येथे लग्न खर्चासाठी आणलेली 15 हजार रक्कम असलेल्या बॅगची चोरी झाली. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी हे मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार अनिल  कटके यांनी आरोपींना शोधण्यासाठी स्वतंत्र पथके मध्यप्रदेशात पाठवली.

पोलीस पथकांनी एकूण सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 55 हजार रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली 13 लाख रुपये किंमतीची कार (क्रमांक एमपी 9 सीसीएस 7450) व 9 लाख रुपये किंमतीची कार (क्रमांक एमपी 9 डब्ल्यूजी 5813), तसेच 78 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 6 मोबाईल असा एकूण 23 लाख 33 हजार रुपये किमतीचे वाहने व रोख रक्कम जप्त केली. पकडण्यात आलेला सर्व आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासासाठी शिर्डी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक कारण्यात आलेल्या आरोपींची नावे- गोलू उर्फ सुमेर सिसोदिया (वय-25), संदीप सुमेर झोजा उर्फ सिसोदिया (वय- 19 मूळ रा. बडा पिपलीयॉ जि. देवास, मध्यप्रदेश ह रा. बाजारपूर जैधपुर ज्ञानमंदिर गल्ली नं. 4 मकान नं. 380 न्यू दिल्ली), राधेश्याम उदयराम रजपूत उर्फ ठाकूर (वय-30, रा. अलीविहार ए 310 सरिताविहार दिल्ली), बिपीन राजपाल सिंग, गिरीराज दिनेशचंद्र शुक्ला, (वय 25, रा.ए 978 /11 जैधपूर, पार्ट-2, बदापूर नवी दिल्ली), अनिल कमल सिसोदिया (वय- 30, ह.रा.जैधपूर, ज्ञानमंदिर गल्ली नं. 4 मकान नं. 380 नवीदिल्ली, मूळ रा. बडा पिपलियॉ, जि. देवास, मध्यप्रदेश), विशालकुमार बनी सिंग (वय 19, रा. 98 ए, राशननगर, अगवानपूर, हरियाणा) यांना ताब्यात घेतले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि मिथुन घुगे, पोसई गणेश इंगळे, सफौ सोन्याबापु नानेकर, पोहेकाँ दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोना संदीप पवार, सुनील चव्हाण, शंकर चौधरी, विशाल दळवी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, पोकॉ संदीप दरंदले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.