पुणे – डेक्कन जिमखाना संघाने 19 वर्षाखालील गटाच्या मनोहर करंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविले.
प्रथम फलंदाजी करताना रेडियंट संघाचा डाव 16.3 षटकांमध्ये 40 धावांमध्ये कोसळला. त्यामध्ये हितांशु भरड याने सर्वाधिक 14 धावा केल्या.डेक्कन जिमखाना संघाकडून ऋषभ पवार याने नऊ धावांमध्ये चार गडी बाद केले. श्रेयस जिवणे यानेही चार गडी बाद केले. त्यांचे सहकारी यश बोरामणी व निश्चय नवले यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
डेक्कन जिमखाना संघाने विजयासाठी असलेले आव्हान केवळ 6.2 षटकांमध्ये पार केले. त्यांच्याकडून यश बोरामणी याने नाबाद 19 धावा केल्या तर श्रेयस जिवणे याने नाबाद 10 धावा केल्या. अवांतर 13 धावांचाही त्यांच्या विजयात वाटा होता.श्रेयस जिवणे याने सामन्याचा मानकरी किताब पटकाविला.
संक्षिप्त धावफलक-
रेडियंट संघ 16.3 षटकांत सर्वबाद 40 (हितांशु भरड 14, ऋषभ पवार 4/9, श्रेयस जिवणे 4/9) पराभूत विरूध्द डेक्कन जिमखाना 6.2 षटकांत बिनबाद 42 (यश बोरामणी नाबाद 19, श्रेयस जिवणेनाबाद 10)