धक्कादायक! 4 हजार महिलांची परवानगी विना नसबंदी

कोलंबो: एका मुस्लीम डॉक्‍टरने 4 हजार बौद्ध सिंहला महिलांची त्यांच्या परवानगी विना गुपचुप नसबंदी केल्याचे धक्कादायक वृत्त श्रीलंकेतल्या आघाडीच्या वृत्तपत्राने दिले असुन त्यामुळे तेथे एकच खळबळ उडाली आहे. त्यातच या प्रकरणातला डॉक्‍टर हा कोलंबो या ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असलेल्या नॅशनल तौहीद जमात या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. 23 मे रोजी येथील स्थानीक डिव्हाईन या वृत्तपत्राने पहिल्या पानावर या प्रकारासंदर्भातले वृत्त प्रकाशित केले होते.

डॉ. सेगू शहाबुद्दीन मोहम्मद शफी असे या आरोपी डॉक्‍टरचे नाव आहे. श्रीलंकेतल्या साखळी स्फोटात 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान ही बातमी आम्ही पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवर, रूग्णालयांमधल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिली आहे. आम्ही ज्या महिलांवर आशा प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत आम्ही त्यांची ओळख समोर आणू इच्छित नाही असेही त्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी सर्वांना सांगितले आहे.

डॉक्‍टर सेगू शहाबुद्दीन शफी या डॉक्‍टरला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्याला पैशांची अफरातफर केल्याच्या प्रकरणात अटक झाली आहे. नसबंदी प्रकरणाबाबत माहिती देण्यास या डॉक्‍टरने नकार दिल्याचे पोलिसांनी रॉयटर्सला सांगितले आहे. या डॉक्‍टरने कुरुनेगला या ठिकाणी असलेल्या रूग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांवर त्यांची संमती न घेत गुपचूप नसबंदीची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान हे वृत्त समोर आल्याने श्रीलंकेत चांगलाच तणाव निर्माण झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.