पिंपळे गुरव, (वार्ताहर) – ब्रह्म संप्रदाय प्रणित स्व-स्वरूप शोधक साधक संस्थेने पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकातील मैदानामध्ये भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भव्य मंडप, चौकाचौकात कमानी, प्रवेशद्वार, विद्युत रोषणाई, भव्य स्टेज त्यावरील महाराजांची आसन व्यवस्था, बैठक व्यवस्था करण्यात आली.
धुलीवंदन दिवशीपासून भागवत कथेला सुरवात झाली. दरम्यान भागवत कथेची सुरवात मिरवणूक काढून करण्यात आली. त्यानंतर देहूचे हभप महाराज पंकज गावडे, हभप विजू शेठ जगताप, हभप विजू आण्ण जगताप, हभप शिवानंद महाराज, हभप तुकाराम महाराज, हभप बुब्रवान महाराज वाघ, स्व-स्वरूप शोधक साधक संस्थेचे विश्वस्त व कार्यकारणी मंडळ यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले.
राघव चैतन्य काटे महाराज यांनी कथेला सुरवात केली. याप्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनुष्य जन्मामध्ये भागवत कथेचे महत्व, भागवत कथा श्रवण केल्याने मनुष्य भगवंत मय होतो व जिवन सुखमय, संस्कारी जीवन जगण्याचा मार्ग प्राप्त होतो. असे राघव चैतन्य काटे महाराज यांनी कथेच्या माध्यमातून विचार मांडले.