कारगिल – भारतीय हवाई दलाने रविवारी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हवाई दलाचे हर्क्युलस विमान ‘सी-१३० जे’ने कारगिल हवाई धावपट्टीवर रात्रीचे पहिले लँडिंग केले. कारगिलची ही हवाईपट्टी चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेली आहे. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी येथे विमानाचे लँडिंग करणे खूप कठीण होते.
परंतु या मोहिमेने आव्हानात्मक वातावरणात भारतीय वायुसेनेच्या क्षमतेचे दर्शन घडवले. भारतीय हवाई दलाने म्हटले आहे की, कारगिल हवाई पट्टीवर रात्रीच्या लँडिंग दरम्यान भूप्रदेश मास्किंग केले गेले. या सरावामुळे गरुड कमांडोंच्या प्रशिक्षण मोहिमेतही मदत झाली आहे.
भारतीय सैन्याने आपली क्षमता वाढवली आहे. हवाई दल दिवसाच नव्हे तर रात्रीही भारतीय सीमेवर आपली दक्षता वाढवत आहे. यामुळेच हवाई दलाच्या हर्क्युलस विमानाला रात्रीच्या वेळी कारगिल हवाई पट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न यशस्वीही झाला.
वास्तविक, हवाई दलाची ही मोहीम त्या सरावाचा एक भाग होता, ज्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत कमांडोना शक्य तितक्या लवकर मोर्चांवर पाठवले जाऊ शकते. या मोहिमेदरम्यान हवाई दलाने टेरेन मास्किंग तंत्रज्ञानाचा वापर केला. वास्तविक, ही एक अशी रणनीती आहे ज्यामध्ये शत्रूच्या रडारला चकमा देऊन विमान आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचते.