नवी दिल्ली, दि. 26- देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डने राइड टू सेफ्टी गाणे लॉंच केले आहे. रस्ते सुरक्षेबाबत लोकांच्या सवयी बदलण्याचा या कंपनीचा प्रयत्न आहे.
हे गाणे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी गायले आहे. या गाण्याचे प्रकाशन परिवहन व महामार्ग व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
‘ऐ भाई, ज़रा देख के चलो’
शंकर महादेवन जी ने सड़क सुरक्षा का ऐन्थम गाया है। हम सभी को सीखना है ताकि एक दिन हम ‘ज़ीरो रोड ऐक्सिडेंट’ तक पहुँच सकें। #RoadSafety #PragatiKaHighway pic.twitter.com/2bRHUED6Cp— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) March 25, 2021
जागतिक बॅंकेच्या 2018 च्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी रस्ते अपघातात जास्तीत जास्त दीड लाख लोकांचा मृत्यू होत आहे. या अपघातांमुळे भारताचा जीडीपीच्या तीन टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे.
ऑक्टोबर 2020 मध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, देशातील रस्ते अपघातात ठार झालेल्यांपैकी 37 टक्के लोक दुचाकी चालक होते. हेल्मेट न घातल्यामुळे 44,666 लोक मरण पावले.
यापैकी 30148 लोक दुचाकी चालवत होते तर 14,518 लोक मागे बसले होते. 2019 मध्ये रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंपैकी हे 29.8 टक्के आहे. रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या पाहता लोकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत अधिक जागरूकता असणे आवश्यक आहे.