श्रीनगर – काश्मिरात गनिमांनी फयाज अहमद नावाच्या एका स्पेशल पोलीस ऑफिसरची काल रात्री अकराच्या सुमाराला त्याच्या कुटुंबीयांसह हत्या केली.
हरिपरिगाम या त्यांच्या गावातील घरातच हा प्रकार घडला. यात त्यांची पत्नी रजा बेगम आणि मुलगी रफिया या दोघीही ठार झाल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने या भागाला वेढा दिला पण हल्लेखोरांचा शोध लागू शकला नाही.
दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांवरील हल्ले वाढवले असून गेल्याच आठवड्यात नोवगाम आणि इदगाह भागात दहशतवाद्यांनी एक पोलीस निरीक्षक आणि एका पोलीस कॉन्स्टेबलची हत्या केली होती.
काल जम्मूत हवाईदलाच्या विमानतळावर ड्रोनने हल्ला झाला होता. त्याच दिवशी एसपीओच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली आहे.