PM Modi Kashmir Visit| लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील देशभरात दौरे करत आहेत. यातच आता ते आज जम्मू-काश्मिरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. विशेष म्हणजे कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा येथे जाणार असल्याने कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. यावेळी ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच जाहीर सभेला देखील संबोधित करणार आहेत.
नरेंद्र मोदी यापूर्वी 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये प्रचारासाठी गेले होते. त्यानंतर कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. जम्मू काश्मीर मध्ये 6400 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प भेट देतील आणि 1000 तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्र देतील. तर पंतप्रधान मोदी यांची श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये जाहीर सभा होणार असून यात 2 लाखांहून अधिक लोक सहभागी होतील, असा भाजपचा दावा आहे.
कसा असणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 मार्च रोजी दुपारी 12 वाजता श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये पोहोचतील.
- त्यानंतर ‘विकसित भारत विकसित जम्मू-काश्मीर’ कार्यक्रमात ते सहभागी होतील.
- पंतप्रधान जम्मू आणि काश्मीरमध्ये कृषी-अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुमारे 5000 कोटी रुपयांचा ‘संमिश्र कृषी विकास कार्यक्रम’ राष्ट्राला समर्पित करतील.
- पंतप्रधान जम्मू आणि काश्मीरमध्ये कृषी-अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुमारे 5000 कोटी रुपयांचा ‘संमिश्र कृषी विकास कार्यक्रम’ राष्ट्राला समर्पित करतील.
- पंतप्रधान जम्मू-काश्मीरमधील सुमारे 1000 नवीन सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करतील
- पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय डायस्पोरा यांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान ‘चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा कॅम्पेन’ लाँच करतील.
मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. झेलम नदी आणि दल सरोवरात मरीन कमांडो तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींच्या श्रीनगरमधील मुक्कामादरम्यान सर्व मार्गांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर केला जात आहे.