पुणे – व्हॉटस अपवर हत्यारासहीत तसेच वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाच्या मुसक्या गुन्हे शाखा चारच्या पथकाने आवळल्या आहेत. मागील काही दिवसांत पोलिसांनी आपला मोर्चा रायझिंग गॅंगकडे वळवला. यातच अशा प्रकारे स्टेटस ठेवण्याची क्रेझ तरुणांमध्ये मोठी आहे. यामुळे गुन्हेगारीला उत्तेजन मिळत असल्याने पोलिसांनी वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
युनिट चारमधील पोलीस हवालदार दीपक भुजबळ यांना खबर मिळाली की अनिकेत साठे (19,रा.आंबेडकर नगर चंदन नगर पुणे) हा नेहमी त्याचे व्हॉट्सअपवर हातामध्ये हत्यार घेऊन स्टेटस ठेवत असतो तो आता चंदन नगर पाण्याचे टाकी जवळ थांबला आहे. त्याच्याकडे आत्ता सुद्धा हत्यार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सहायक पोलीस निरीक्षक संदीप संदीप जमदाडे व सहा फौजदार गणेश साळुंके, पोलीस हवालदार राजस शेख, दिपक भुजबळ, पोलीस नाईक कौस्तुभ जाधव, सुरेंद्र साबळे, स्वप्निल कांबळे यांनी सापळा रचून अनिकेत साठे यास चंदन नगर पाण्याच्या टाकी जवळून ताब्यात घेतले.
त्याचे कब्जातून एक तीनशे रुपये चा लोखंडी कोयता जप्त करून त्याचेवर चंदन नगर पोलिस ठाण्यात हत्यार अधिनियम कलम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली केलेली आहे.