देशाच्या सीमावर्ती भागातील कांदा निर्यातीला केंद्र सरकारची विशेष परवानगी

नवी दिल्ली : देशात एकीकडे कांदा निर्यात बंदी केल्यानंतर केंद्राच्या या निर्णयाचा सर्वच स्तरातून विरोध होत आहे. त्यातच सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या सीमावर्ती भागामध्ये निर्यातीसाठी गेलेला कांदा मागील काही दिवसांपासून तसाच पडून आहे. कांदा खराब होण्याच्या चिंतेने काही संघटनांनी सीमावर्ती भागातील कांदा निर्यातीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती. याच मागणीचा विचार करून केंद्र सरकारकडून देशाच्या सीमावर्ती भागातील अडकलेल्या कांद्याच्या निर्यातीला विशेष परवानगी दिली आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे दिसत आहे.

बांगलादेश आणि भारत यांच्या सीमावर्ती भागात पाच ट्रकमध्ये तब्बल 25,000 टन कांदा मागील काही दिवसांपासून पडून आहे. दरम्यान, हा कांदा निर्यात करण्यासाठी भारत सरकारने आज विशेष परवानगी दिली आहे, या विषयीची माहिती स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या अगोदर स्थानिक व्यापाऱ्यांनी देशाच्या सीमेपर्यंत पोहचलेल्या कांद्याच्या निर्यातिची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सरकारकडे केली होती. त्यावर देशाच्या विविध बंदरांवर अडकलेल्या कांद्याने भरलेल्या ट्रक व कंटेनर यांना अंशत: विश्रांतीचा एक भाग म्हणून मंजुरी दिली जाऊ शकते, असे विदेश व्यापार महासंचालकांकडून सांगण्यात आले होते.

केंद्र सरकारने सोमवारी अचानक देशातील कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगण्यात यात आहे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या कांद्याला चांगला भाव त्यातच सरकारच्या या निर्णयाला शेतकऱ्यांनी देखील मोठा विरोध केला आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात देशात मोठी निदर्शने देखील करण्यात आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.