विशेष मुलांनी केली “दुर्ग’ भ्रमंती

पालकांचाही सहभाग : “चला घेऊया निसर्गानुभव’ उपक्रम
पिंपरी  – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विशेष मुलांनी पहिल्यांदाच दुर्ग भ्रमंतीचा आनंद दिवेघाटातील मल्हारगड येथे घेतला. अलाईव्ह संस्थेच्या “चला घेऊया निसर्गानुभव’ या उपक्रमात एकुण 16 विशेष मुलामुलींनी त्यांच्या 16 पालकांसह मल्हारगड पायथापासून ते वर बालेकिल्ल्यापर्यंत वर्षाविहारसह दुर्ग भ्रमंती केली.

या उपक्रमाचे उद्दिष्ट विशेष मुलांनी शहरात रोज दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा वेगळे जग असते त्याची जाणीव व्हावी हे होते. या उपक्रमात सहभागी झालेली मुले गतिमंद, अध्ययन अक्षमता, स्वमग्न, अंध, अतिचंचलता, सेरेब्रल पाल्सी, अशा विविध आजारांनी ग्रस्त आहेत. गडाच्या पायथ्यावर पोचल्यावर समोर दिसणारा मोठा डोंगर, परिसरात पसरलेली गोल व वेगवेगळ्या आकाराची दगड, मधेच कुठे माती, गवत, खुरटी झुडुपं हे सगळं निरिक्षणात मुलांना कुतुहल वाटत होते. किल्ला चढताना मुलांनी चिखलातून चालणे, पावसात भिजणे, तसेच थोडीबहुत घसरगुंडीचीही मज्जा घेतली. साधारण अर्धा ते पाऊण तासाच्या चढाईनंतर सर्व मुले बालेकिल्ल्यावर पोहोचले.

या उपक्रमाचे नेतृत्व अलाईव्हचे सदस्य प्रशांत पिंपळनेरकर आणि दर्शना पिंपळनेरकर यांनी केले. आमची मुले कधी किल्ल्यावर चढू शकतील असा कधीही विचार केला नव्हता. परंतु, “चला घेऊया निसर्गानुभव’ या उपक्रमामुळे हे शक्‍य झाले, अशी भावना सहभागी विशेष मुलांच्या पालकांनी व्यक्त केली. यश खामकर आणि विनय धायबर यांनी सहकार्य केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)