बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने यंदा आपला वाढदिवस आपल्या घरीच साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टीऐवजी वरुणने चित्रपटसृष्टीत रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी वरुण धवनने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निधीलाही मदत केलेली आहे.
वरुण धवनने वाढदिवसाच्या निमित्ताने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्प्लॉईजला आर्थिक मदत जाहीर केली आहे. यानंतर एफडब्ल्यूईसी एंटरटेनमेंट डेली व्हेज कामगारांनी देणगी दिल्याबद्दल वरुण धवनचे आभार मानत त्याला वाढदिवशाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
वरुण धवनने आपला वाढदिवस घरी साजरा केला आणि इंस्टाग्रामवर काही फोटोही पोस्ट केले आहेत. यामध्ये तो आपल्या स्वच्छ चेहऱ्याबद्दल बोलत आहे. केक कापल्यानंतरही त्याचा चेहरा स्वच्छ असल्याचे ते पोस्टच्या माध्यमातून सांगत आहेत. वास्तविक वरुण धवन दरवेळी आपल्या मित्रांसमवेत वाढदिवस साजरा केला असल्याने त्याच्या तोंडावर केक असायचा.
दरम्यान, वरुण धवनने करोनाच्या युद्धात सरकारला मदत करण्यासाठी 55 लाख रुपये निधी दिला आहे. वरुण धवनने पीएम कॅरेस फंडमध्ये 30 लाख आणि मुख्यमंत्री रिलीफ फंडात 25 लाखांची देणगी दिली आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास “स्ट्रीट डान्सर 3 डी’मध्ये तो झळकला होता आणि त्याचा “कुली नंबर 1′ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.