पुणे – नागपूर येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई, पुणे आणि सोलापूरहून चार विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून या विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या चारही विशेष गाड्यांचे तिकिट बुकींग शुक्रवारी (दि. 20 ऑक्टोबर) पासून सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
नागपूर-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस (01018) वन वे स्पेशल गाडी येत्या 24 ऑक्टोबरला रात्री 8:00 वाजता नागपूर येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी 12:00 वाजता मुंबई येथे पोहचले. 22 ठिकाणी गाडीला थांबे असून 20 कोचची गाडी असेल. नागपूर- पुणे (01030) वन वे स्पेशल गाडी नागपूरहून 24 ऑक्टोबरला रात्री 11:00 वाजता सुटेल. तर, दुसऱ्या दिवशी सायंकाळी पावणेसहा वाजता पुण्यात पोहचेल. 24 कोचची ही गाडी असेल. 23 ठिकाणी गाडीला थांबे आहेत.
नागपूर-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस (01032) वन वे स्पेशल गाडी 25 ऑक्टोबरला दुपारी 3:00 वाजता गाडी सुटेल. 22 थांबे घेत दुसऱ्या दिवशी सकाळी 8:15 वाजता मुंबईत गाडी पोहचेल. तर सोलापूर-नागपूर (01029) वन वे स्पेशल गाडी 24 ऑक्टोबरला रात्री 8:20 वाजता सोलापूर येथून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी दुपारी 1:05 मिनिटांनी नागपूरला पोहचेल. 14 ठिकाणी गाडीला थांबे आहेत.