बाजारपेठेतील रस्त्यावर वृक्षारोपणाचा सहकार सेनेचा इशारा
पळसदेव – गावातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी धोकादायक ठरत असून, या मोकळ्या खडीमुळे मोटारसायकलस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे.
वाहनाच्या टायर खालून खडा उडून लागण्याच्या घटना घडल्या असून ठेकेदाराच्या दिरंगाईचा ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
होणाऱ्या अपघाताच्या घटना वाढतच चालल्या असल्यामुळे सोमवार (दि. 23) पर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास दसऱ्याच्या मुहूर्तावर पळसदेव गावातील मुख्य बाजापेठेत नारळ व आंब्याची रोपे लावून प्रशासनाचा व ठेकेदारांचा निषेध करणार असल्याचे मत सहकार सेनेचे (शिंदे गट) राष्ट्रीय उपाध्यक्ष सूरज काळे व जिल्हा अध्यक्ष विजय पवार यांनी दिली.
सोमवारपर्यंत आम्ही कामाला सुरुवात करणार आहोत.
– बबलू खत्री, ठेकेदार.