मुंबई – बॉलिवूडचे महानायक म्हणजेच, अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देशभरातील तमाम मुस्लिम बांधवांना ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बींनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून त्यांनी या शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम बांधवांसाठी ‘रमजान ईद’ हा सॅन अतिशय महत्वाचा असतो. या सणानिमित्त मुस्लिम बांधव एकत्र येऊन नमाज अदा करतात. त्यानंतर आपल्या आप्तलगांना आलिंगन देऊन, भेटवस्तू देऊन ईदी देतात. त्यांच्यासाठी हा सण फार खास असतो. या रमजानच्या रोजाच्या दिवसात या लोकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळतो.