पुणे – मार्केटयार्ड येथील एका कार्यालयातून 12 लाख 43 हजाराचे लॅपटॉप चोरण्यात आले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विष्णुकांत लढ्ढा(37,रा.गंगाधाम चौक) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे बिबवेवाडी येथील विराज कुमॉल येथे तीसऱ्या मजल्यावर कार्यालय आहे. लॉक डाऊनमुळे त्यांचे कार्यालय बंद होते. अज्ञात चोरट्यांने त्यांचे कार्यालय बनावट चावीने उघडले.
यानंरत तेथील ऍपल कंपनीचे 10 लॅपटॉफ ज्याची किंमत 12 लाख 45 हजार होती, ते चोरुन नेले. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक खरात करत आहेत.