435 खड्डे बुजविले, 60 गटारांची झाकणे दुरुस्त केल्याचा दावा
पिंपरी – शहरात गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस सुरु असून त्यामुळे जागोजागी रस्ता खराब झाला आहे. पुणे मेट्रो मार्फत मेट्रो मार्गिकेतील रस्त्यांचे खड्डे, पदपथ, गटारांची झाकणे, पावसाचे पाणी वाहून नेणारे पाइप इत्यांदीची दुरुस्ती युद्ध पातळीवर सुरु केली असल्याचा आणि त्यासाठी विशेष कृती दला स्थापन करण्यात आल्याचा दावा मेट्रोकडून करण्यात आला आहे.
मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार महामेट्रोचे अधिकारी सतत परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत व पावसाळी खड्डे बुजवण्यासाठी एक विशेष कृती दल बनविले आहे. आतापर्यंत पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट या मार्गिकेत 435 पावसाळी खड्डे, 60 गटारांचे झाकणे दुरुस्त करण्यात आले आहेत. तसेच 60 मीटर कॉंक्रिट रोड नवीन बनविला आहे. महामेट्रोने ठिकठिकाणी वाहतूक दिशादर्शक चिन्हे, वाहतूक चिन्हे, दिवे, वाहतूक फलक, लावले असून त्यामुळे वाहतूक नियमन करण्यास मदत होत आहे.