लंडन – प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या साखळी साऊदम्टनने टॉटनहॅमचा 3-2 असा पराभव केला व आगेकूच केली. या सामन्यात साऊदम्टनकडून अर्मान्डो ब्रोजा (23वे मिनीट), महंमद एलोनुसी (80 वे) आणि शे ऍडम्स (82 वे) यांनी गोल केले.
अन्य लढतींत, रियाद महारेझ (40 वे) आणि केव्हिन डी ब्रून (69 वे) यांच्या गोलमुळे गतविजेत्या मॅंचेस्टर सिटीने ब्रेंटफर्डला 2-0 असे पराभूत केले. सिटीने सर्वाधिक 60 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे, तर अन्य एका सामन्यात ऍश्टन व्हिला आणि लीड्स युनायटेड यांच्यात 3-3 अशी बरोबरी झाली.