मुंबई : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अल्लू अर्जुन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘पुष्पा’ स्टार अल्लू चित्रपट निर्माता भूषण कुमार आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्यासोबत एक चित्रपट करणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर झाले नसले तरी अल्लू अर्जुनने चित्रपट साइन केला आहे. अशात पुष्पाच्या चाहत्यांसाठी ही बातमी एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नाही.
BIGGG NEWS… ALLU ARJUN TO STAR IN SANDEEP REDDY VANGA – BHUSHAN KUMAR FILM… #SandeepReddyVanga – currently directing #Animal – will direct #AlluArjun… Filming to commence after #SandeepReddyVanga completes #Spirit. pic.twitter.com/QJ81Hd7QwL
— taran adarsh (@taran_adarsh) March 3, 2023
चित्रपटसृष्टीतील तीन पॉवरहाऊस, निर्माता भूषण कुमार, दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा आणि साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन एकत्र चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती टी-सिरीज फिल्म्स प्रोडक्शन आणि भद्रकाली पिक्चर्स करणार आहेत. अल्लू अर्जुनने अलीकडेच दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा आणि भूषण कुमार यांचीही भेट घेतली होती. संदीप वनगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’ हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. मात्र, नावाबाबत काही अपडेट्स अद्याप समोर आलेले नाहीत.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर याबद्दल बोलले आहे. अल्लू अर्जुन, भूषण कुमार आणि रेड्डी वंगा यांचा फोटो शेअर करत तरण आदर्शने लिहिले, ‘सर्वात मोठी बातमी! अल्लू अर्जुन संदीप रेड्डी आणि भूषण कुमार यांच्या चित्रपटात येतोय.’