लंडन – दक्षिण आफ्रिकेचा मंगळवारी ५ जून रोजी भारतीय संघाविरुद्ध सामना आहे, मात्र भारताविरूध्द होणाऱ्या या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला एका मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन याला दुखापतीमुळे 2019 विश्वचषकातून मुकावे लागणार आहे.
BREAKING: Dale Steyn is out of #CWC19 after suffering a second shoulder injury which has not responded to treatment. Left-arm fast bowler @Beuran_H13 joins the squad ahead of tomorrow's crucial clash against India in Southampton.
More 👉 https://t.co/5nkzT2mgHq pic.twitter.com/W3eaiEJpvu
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 4, 2019
खांद्याच्या दुखापतीमुळे डेल स्टेन हा विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मागील दोन सामन्यामध्ये खेळू शकला नव्हता, त्यामुळे या दोन्हीही सामन्यात आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला होता.
आता डेल स्टेन ऐवजी बदली खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकासाठी ब्युरन हेंड्रिक्स या गोलदांजाचा संघात समावेश केला आहे. हेंड्रिक्स हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत डेल स्टेनच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर स्टेनला बराच काळ क्रिकेटपासून दूर राहावं लागलं होत. सध्या डेल स्टेनच्या खांद्यावर उपचार सुरू आहेत. पण अद्याप उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पुढील सामन्यासाठी स्टेन पुर्णपणे तंदुरस्त नसल्याने त्याला विश्रांतीची गरज असल्याचे डाॅक्टारांनी सांगितल आहे. त्यामुळं डेल स्टेनला विश्वचषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे.