IND vs SA 2nd T20 Toss Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (12 डिसेंबर) खेळवला जात आहे. रविवारी डर्बनमध्ये पावसामुळे मालिकेतील पहिला सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर उभय संघांमधला दुसरा टी-20 सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे होत आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे . टीम इंडिया प्रथम फलंदाजी करेल. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून कोणत्याही खेळाडूने पदार्पण केलेले नाही. या सामन्यात रुतुराज गायकवाड खेळत नाहीये. तो आजारी आहे.
IND vs SA 2nd T20 : दक्षिण अफ्रिकेनं जिंकला टॉस, कर्णधार मार्करमनं घेतला ‘हा’ निर्णय…
IND vs SA Live Score : दोन्ही संघाची प्लेइंग-11
भारत : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका : मॅथ्यू ब्रिट्झके, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, अँडिले फेहलुकवायो, जेराल्ड कोएत्झी, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी.
🚨 Here’s #TeamIndia‘s Playing XI 🔽
Follow the Match 👉 https://t.co/4DtSrebAgI
𝗡𝗢𝗧𝗘: Ruturaj Gaikwad was unavailable for selection for the 2nd #SAvIND T20I due to illness. pic.twitter.com/K52YOOgbwn
— BCCI (@BCCI) December 12, 2023
टी-20 विश्वचषकापूर्वी फक्त पाच टी-20 सामने
दरम्यान, डर्बनमधील सामना रद्द झाल्यामुळे आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी योग्य खेळाचे संयोजन शोधण्याच्या भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाने संपूर्ण टी-20 मालिकेसाठी अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे. कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी उपलब्ध नाहीत.
दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार करत आहे. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या कठीण परिस्थितीत युवा खेळाडूंना आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळेल, अशी आशा संघ व्यवस्थापनाला आहे.