केपटाऊन – भारतीय पुरुष हॉकी संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपली अपराजित घोडदौड कायम ठेवत येथे यजमानांचा ३-० असा सहज विजय नोंदवला. शुक्रवारी रात्री विजयासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंग (02), अभिषेक (13) आणि सुमित (30) यांनी गोल केले.
भारतीयांनी आक्रमक सुरुवात केली आणि लवकर पेनल्टी कॉर्नर मिळवला, जो हरमनप्रीतने शक्तिशाली ड्रॅगफ्लिकसह बदलून आघाडी घेतली. पहिल्या सत्राची अवघी दोन मिनिटे बाकी असताना अभिषेकने आक्रमक चालीचा सपाटा लावला. अभिषेकने झटपट फटका मारत दक्षिण आफ्रिकेच्या गोलरक्षकाला चीतपट केले आणि भारताची आघाडी दुप्पट केली.
🚨 FULL TIME 🚨
India 🇮🇳 3 – South Africa 🇿🇦 0
Indian Men’s team triumphs with a resounding 3-0 victory over South Africa.
🏑Goal Scorers:
2′ Singh Harmanpreet (PC)
13′ Abhishek
30′ Sumit#SATour #HockeyIndia #IndiaKaGame #IndianMensTeam
.
.
.
.#HockeyIndia #IndiaKaGame… pic.twitter.com/YB8NJVzsVp— Hockey India (@TheHockeyIndia) January 26, 2024
दुसऱ्या क्वार्टरमध्ये दक्षिण आफ्रिकेने अनेक आक्रमणे करूनही भारताचा बचाव संयमी राहिला आणि त्यांनी एकही गोल होऊ दिला नाही. हाफ टाईमपूर्वी सुमितला मैदानी गोल करण्यात यश आले आणि भारताने 3-0 अशी आघाडी घेतली. आता भारताचा सामना रविवारी नेदरलँडशी होणार आहे.