केपटाउन : सलामीवीर क्विंटन डी काॅकच्या शानदार शतकी आणि टेम्बा बवुमाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा ७ विकेटनी पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. क्विंटन डी काॅक हा सामन्याचा मानकरी ठरला.
South Africa win by 7️⃣ wickets!
A perfect start to a new era for the Proteas' ODI side. #SAvENG pic.twitter.com/xAlcADsXgy
— ICC (@ICC) February 4, 2020
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या २५९ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने ४७.४ षटकात ३ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजीत क्विटंन डी काॅकने १०७(११३), टेम्बा बवुमाने ९८(१०३) आणि रैसी वैन डर डुसेनने नाबाद ३८(४५) धावांची खेळी केली. इंग्लंडकडून क्रिस जाॅर्डन, जो रूट आणि क्रिस वोक्सने प्रत्येकी १ गडी बाद केला.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इंग्लंडने फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २५८ अशी मजल मारली होती. इंग्लंडकडून फलंदाजीत जो डेनलीने ८७(१०३), क्रिस वोक्सने ४०(४२) आणि जेसन राॅयने ३२(३२) धावांची खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत तरबेज शम्सीने सर्वाधिक ३ तर ब्यूरन हेंड्रिक्स, जेजे स्मट्स, एंडिल फेहलुकवायो आणि लुथो सिम्पाला यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.