South actress Soumya Shetty arrested : आंध्र प्रदेशच्या विझाग शहर पोलिसांनी सोन्याच्या चोरी प्रकरणी प्रसिद्ध सोशल मीडिया प्रभावकार आणि तेलगू अभिनेत्री सौम्या शेट्टीला अटक केली आहे. भारतीय पोस्ट खात्यातून निवृत्त झालेल्या प्रसाद बाबू नामक व्यक्तीने नुकतीच त्यांच्या घरातून १५० तोळे सोने चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौम्या अनेकदा आपली मुलगी मौनिकाला भेटण्यासाठी शेट्टी प्रसाद बाबू यांच्या फ्लॅटवर येत असे. तिने प्रसादबाबूंच्या कुटुंबीयांचा विश्वास जिंकला. | South actress Soumya Shetty arrested
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौम्याने वारंवार बाथरूममधून त्यांच्या बेडरूममध्ये प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने चोरले. लग्न आटोपून परत आल्यावर मौनिकाच्या कुटुंबीयांना सोने् हरवल्याचे लक्षात आल्यावर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी बोटांचे ठसे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. या आधारे ११ जण संशयाच्या भोवऱ्यात आले. यानंतर सौम्या शेट्टीसह ३ जणांना ताब्यात घेण्यात आले. | South actress Soumya Shetty arrested
चौकशीदरम्यान सौम्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून ७४ ग्रॅम सोनेही पोलिसांनी जप्त केले आहे. सोन्याची चोरी झाल्यानंतर सौम्या गोव्यात पळून गेली होती. | South actress Soumya Shetty arrested