मुंबई – साऊथची सुपरस्टार समंथा रुथ प्रभू सध्या सतत चर्चेत असते. समंथा कधी तिच्या फिल्म प्रोजेक्टमुळे चर्चेत येते, तर कधी तिच्या फोटोंमुळे. नुकतच सामंथाचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्याला प्रेक्षकांनी संमिश्र असा प्रतिसाद दिला.
शाकुंतलम या चित्रपटातील समंथाचा अभिनय सर्वांना खूप आवडला, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. अशात आता समंताची 10 वीची मार्कशीट व्हायरल होत आहे.ज्यावरून नेटकरी समंथाला किती विषयात किती गन मिळाले यावर भाष्य करत आहेत.
सामंथा तिचे 10 वी वर्गाचे रिपोर्ट कार्ड व्हायरल झाल्यानंतर पुन्हा चर्चेत आली आहे. हे रिपोर्ट कार्ड रिट्विट करून स्वतः समंथाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. समंथाच्या या रिपोर्ट कार्डमधील तिचा नंबर पाहून ती एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच शालेय जीवनातही हुशार विद्यार्थी होती असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या रिपोर्ट कार्डमध्ये, समंथाला सर्व विषयांमध्ये 80 पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून येत आहे. परंतु तिचे गणितातील गुण पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. समंथाने गणितात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत.
सामंथा प्रभूने तिचे व्हायरल रिपोर्ट कार्ड शेअर करताना पहिल्यांदाच टिप्पणी केली. तिने लिहिले, ‘हा हा हे पुन्हा व्हायरल झालं आहे…’ ही केवळ तिची मार्कशीट असल्याचे समंथाच्या टिप्पणीवरून स्पष्ट होते. यावर चाहते सतत कमेंट करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना यूजर्स तिला टॉपर म्हणत आहेत. या आधी देखील एकदा समंथाचे रिपोर्ट कार्ड व्हायरल झाले होते.
समंथा रुथ प्रभूच्या आगामी प्रोजेक्टबाबत बोलायचे तर, नुकतच तिचा ‘शकुंतलम’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर ती लवकरच विजय देवरकोंडासोबत ‘खुशी’ या रोमँटिक चित्रपटात दिसणार आहे. केवळ समंथाच नाही तर तिचे चाहतेही या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. याशिवाय अभिनेत्रीने वरुण धवनसोबत ‘सिटाडेल’चे शूटिंग देखील पूर्ण केल्याचे समजते.