श्रीरामपूर – डॉक्टर ठाकूर नेक्सजेन मॅक्सिलोफेशियल इम्प्लांट अँड हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिक यांच्या प्रथम वर्धापन दिन व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या मोफत दंत व मुखरोग तपासणी शिबिरामध्ये सर्वयोगटातील जवळपास दीडशे रुग्णांनी लाभ घेतला.
इतर मोठ्या शहरांमध्ये जी आत्याधुनिक उपचार पद्धती वापरली जाते तीच उपचार पद्धती श्रीरामपुरात मिळाल्यामुळे तसेच शिबिरामध्ये रुग्णांसाठी मोफत एक्स रे सुविधा देण्यात आल्यामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
त्या प्रसंगी डॉक्टर ठाकूर म्हणाले आमच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर यशस्वी उपचार तसेच रुग्णांचे समाधान हेच आमचे समाधान आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रणयकुमार ठाकूर, डॉ. मीनाक्षी ठाकूर तसेच कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.