मुंबई – साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री सई पल्लवीने तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. सई पल्लवी तिच्या खास शैलीसाठी ओळखली जाते. तिच्या अभिनयासोबतच साधेपणासाठीही साईपल्लवी प्रसिद्ध आहे.
साईपल्लवीने कमी वयात यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. तिने ‘लव्ह स्टोरी’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. आज ती 31 वा वाढविस्वास साजरा करत आहे. अशात वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्या लव्ह लाईफबद्दल सांगणार आहोत, जेव्हा ती फ्लर्ट करताना पकडली गेली होती.
साऊथ सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री सई पल्लवी हिचा जन्म १९९२ मध्ये आजच्या दिवशी कोटागिरी येथे झाला. कमी वयात आणि अल्पावधीतच तिने इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली आणि एक यशस्वी अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण झाली. साईपल्लवीने 2015 मध्ये मल्याळम चित्रपट ‘प्रेमम’मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. यामध्ये समीक्षकांनी तिचे खूप कौतुक केले.’
सई पल्लवीने तिच्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये त्याने ‘लव्ह स्टोरी’, ‘श्याम सिंघा रॉय’, ‘गार्गी’, ‘मारी 2’ आणि ‘अथिरन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री बनण्या आधी ती डॉक्टर होती हे तिच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. चित्रपटांसोबतच ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
‘माय व्हिलेज’ या शोमध्ये सई पल्लवीने स्वतःची प्रेमकहाणी सांगितली. तिने सांगितले की तिने मी पहिल्यांदा प्रेमपत्र लिहिले होते मी तेव्हा लहान होते माझे प्रेमपत्र पकडल्या गेले होते. अभिनेत्रीने ते प्रेमपत्र एका मुलासाठी लिहिले होते. पण, त्या मुलाला देण्याआधीच ते कुटुंबीयांनी मिळाले. त्यानंतर तिला खूप मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिने कधीच प्रेमपत्र लिहिण्याचे धाडस केले नाही,
‘जेव्हा ती सातव्या वर्गात शिकत होती, त्यावेळी तिने एका मुलासाठी प्रेमपत्र लिहिले होते. मात्र घरच्यांनी तिला पकडले होते. यानंतर त्याला बेदम मारहाणही करण्यात आली.
अभिनेत्रीपूर्वी साई पल्लवी एक प्रोफेशनल डॉक्टर आहे. तिला हृदयरोगतज्ज्ञ व्हायचे होते. त्याने मेडिसिनमध्ये ग्रॅज्युएशनची पदवी देखील घेतली आहे. याशिवाय सई पल्लवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची ‘गार्गी’ चित्रपटात दिसली होती. तो एक तमिळ चित्रपट होता.